Lad Shakhiya Wani samaj website released and its available at www.wanisamaj.org

Sad Demise : ट्रकच्या धडकेने बोलेरोतील ७ ठार

चांदवडहून सोलापूरकडे जाणाऱ्या बोलेरोला बुधवारी मध्यरात्रीनंतर येवल्याजवळ एका ट्रकने धडक दिल्यामुळे बोलेरोतील सातजण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की बोलेरोचा चक्काचूर झाला.

चांदवड येथील किरण शांताराम मेतकर (३०) हा मुलगी पाहण्यासाठी त्याचे धुळे, मनमाड, नगर व चांदवड येथील नातेवाईकासह सोलापूरला जात असताना हा अपघात झाला. त्यात किरणही ठार झाला. या अपघातात किरणचे वडील शांताराम मेतकर (६०) त्याचे नातेवाईक उद्धव महाजन (मनमाड, ५०), योगेश तलवारे (धुळे, ५०), गणेश बुरकुल (नगर, ५०) यांच्यासह चालक सलीम रहीम अत्तार (चांदवड, २६) जागीच ठार झाले. येवल्यापासून २ किलोमीटरवर हा अपघात झाला.

अपघातानंतर ट्रकचा चालक व क्लिनर फरार झाले. येवला शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातात ठार झालेले शांताराम मेतकर हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर चांदवड येथे मुलासोबत किराणा दुकान सुरू केले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरल्यानंतर सर्व नातेवाईक चांदवडला आले व तेथून ते सोलापूरकडे रात्री ११ वाजता रवाना झाले. त्यानंतर अवघ्या तासाभरात हा अपघात झाला.

Accident causes Death of our Wani Samaj Bandhav

पिंपरीतील दोघांचा अपघातात मृत्यू

पिंपरी, ता. ८ - संगमनेर- सिन्नर रस्त्यावर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात सेवा विकास सहकारी बॅंकेचे संचालक जयराम भीवराव पालवे (वय -४८) यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपरीत शोककळा पसरली.
श्री. पालवे यांचे मित्र विजय व्यवहारे यांच्या आईचे नाशिकमध्ये नुकतेच निधन झाले. त्यामुळे व्यवहारे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी श्री. पालवे, त्यांचे मित्र ईश्‍वर परशुराम पाचपुते (वय- ४०), अतुल रामदास शिणकर, त्यांच्या पत्नी उज्ज्वला व मुलगा सुमित असे पाच जण श्री. वाणी यांच्या मोटारीतून शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपरीमधून निघाले. त्यांची मोटार संगमनेर- सिन्नर रस्त्यावरील गोरेवाडीजवळ थांबलेल्या ट्रकवर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाठीमागून धडकली. त्यात श्री. पालवे व श्री. पाचपुते यांचा जागीच मृत्यू झाला. श्री. वाणी त्यांच्या पत्नी व मुलगा असे तिघे जण जखमी झाले आहेत.

श्री. पालवे यांच्यावर पिंपरीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पालवे सेवा विकास सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळावर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विकास पॅनेलतर्फे विजयी झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले आणि तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय होता. त्यांच्या अंत्यविधीला सर्व स्तरातील नागरिक, नगरसेवक, सेवा बॅंकेचे कर्मचारी, अधिकारी, संचालक उपस्थित होते.

श्री. पाचपुते आणि अतुल वाणी नातेवाईक आहेत. श्री. पाचपुते यांच्यावर त्यांच्या मूळगावी धुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ते पुण्यात राहत होते, तर श्री. वाणी हे पिंपरीतील वैभवनगर येथे राहण्यास होते. गणेशनगरमध्ये त्यांचे औषधाचे दुकान आहे.

Want to post information on this blog ?































Name:




Email Address:




Native Place ?




What kind of post you want on blog?

Matrimonial

Classified

News

Other Information



What information you want to post on the blog ? Please write complete information, we will post it on blog after moderation.




Sex

Male

Female








News : Wani samaj included in OBC category


News : Ladshakhiya Wani samaj included in OBC Category

Full story Read it here


15 castes included in OBCs, six to VJNT

Thu, Jun 12 09:40 PM

Mumbai, Jun 12 (PTI) Maharashtra cabinet today decided to include 15 castes in Other Backward Classes (OBC) and six to Vimukta Jati and Nomadic Tribes (VJNT) as suggested by the State Backward Classes Commission. The cabinet has decided to send a proposal to a committee headed by Justice Ashok Agrawal for granting ST status to VJNTs.

The Commission had okayed the proposal to include some catses into the OBC, SC/ST and Special BC. The castes included in the OBC list comrprise Lajhad, Ladshakhiya Vani, Merushimpi, Badgujar, Talwar Kanade, Devadiya, Mitkari Vinkar, Suthar, Vadhai, Kakar, Thiya Belcheda, Pathare Kshatriya Pachkalashi, Dhakad, Patawa, Dorik, and Khtri. The castes given the status of VJNT are Sagar, Sharadakar, Kapewar, Tarunawadi, Gawalan, Chitodia Lohar and Puri.

Muslim Bhangi Mehtar and Salewar have been included as Special backward classes identified by the Commission. The Commission is also trying to give the status of Scheduled Castes and Scheduled Tribes to Kaikadi community and a proposal has been sent to the Dr Babasaheb Ambedkar Research and Training Institute, Pune.

PTI.


Reference : http://in.news.yahoo.com